राबवणार, ‘एक पेड नाती के नाम’ अभियान
लोकवाहिनी न्यूज:नागपूर : नागपुरातील असह्य आणि जीवघेणे तापमान लक्षात घेता, वृक्षारोपणासह वृक्ष संवर्धन-जतन करण्याकरिता डॉ. दंदे फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. या उपक्रमाचा आरंभ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. पिनाक दंदे यावेळी उपस्थित होते.
या उपक्रमाला शुभेच्छा देताना गडकरींनी या उपक्रमाचे कौतुक केले. शहरात वृक्ष लावले आणि संवर्धित केले जातील, असे ते म्हणाले. नितीन गडकरी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिकांच्या सहकार्याने फाउंडेशनच्यावतीने ‘एक पेड नाती के नाम’ हा उपक्रम राबवला जाणार आहे.
नागपूर शहरातील किमान १० नगरांमधील बगीच्यांमध्ये स्थानिकांच्या सहकार्याने भारतीय वंशाच्या वृक्षांचे रोपण आणि स्थानिकांच्या सहकार्याने संवर्धन केले जाईल. या दोन्ही उपक्रमांची सुरुवात पावसाळ्यात दोन-तीन पावसानंतर केली जाईल. गडकरी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रातिनिधिक स्वरुपात लागवडीकरिता वृक्षांचे वितरण पर्यावरणप्रेमी नागरिकांना करण्यात आलं. डॉ. दंदे म्हणाले, की या उपक्रमांतर्गत दुर्मिळ होत चाललेल्या वृक्षांचं जतन, संवर्धन आणि नंतर या वृक्षांचं मल्टिप्लिकेशन करण्याकरिता फाउंडेशन काम करीत आहे. एक-दोन वर्षात या कामाची फलश्रुती समोर येईल.
यावेळी गडकरी यांना ‘कृष्णवड’ अर्थात ‘माखनकटोरी’ हा दुर्मिळ वृक्ष भेट देण्यात आला आणि नंतर या वृक्षाचे रोपण करण्यात आलं.
डॉ. दंदे फाउंडेशनच्या वतीने ‘कृष्णवड (माखनकटोरी)’ वृक्ष देऊन गडकरींचा सन्मान करण्यात आला.













