नातेवाईकांचा डीसीपी कार्यालयाला घेराव
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० च्या सुमारास संघर्ष नगर चौकात झालेल्या रस्ते अपघातात एका उदयोमुख राष्ट्रीय खेळाडूचा मृत्यू झाला. भरधाव येणाऱ्या बाईकची धडक बसल्याने १७ वर्षीय अवनी मुकेश बघेलचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर, स्थानिक नागरिकांनी दुचाकीस्वाराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. कुटूंबियांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी आरोपीला सायंकाळी ७-८ च्या सुमारास पोलिस ठाण्यात नेले, परंतु पहाटे २.३० ते ३ च्या दरम्यान त्याला सोडून देण्यात आले. त्यामुळे नगरसेवक वसीम खान यांच्या नेतृत्वखाली कुटुंबीय, खेळाडू आणि नागरिकांनी अवनीचा मृतदेह रुग्णवाहिकेतून थेट झोन ४ डीसीपींच्या कार्यालययात नेला. तिथे पोलिस प्रशासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. बाईकस्वाराला तत्काल पुन्हा अटक करून या प्रकरणी कठोर कार्रवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.
दीर्घकाळ चाललेल्या आंदोलनांतर नंदनवन पोलिस ठाण्याचे एसीपी आणि पीआय घटनास्थल दाखल झाले. घटनास्थल उपस्थित असलेल्या अवनीच्या बहिणीकडून त्याची ओळख पटवली. दोन्ही बहिणींनी व्हिडिओ कॉल्द्द्वारे त्या व्यक्तीची ओळख पटवली आणि तोच अपघातातील बाईकस्वार असल्याचे सांगितले. अंतसंस्कार पूर्ण होईपर्यंत, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भेट होईपर्यंत आणि कुटुंबांना योग्य कारवाई व मदतीचे आश्वासन मिळेपर्यंत आरोपीला सोडू नये, अशी स्पष्ट मागणी कुटुंबीयांनी केली. यानंतर पोलिस अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर, अवनीचा मृतदेह घरी नेण्यात आला आणि अवनीच्या मृतदेहावर अंतसंस्कार करण्यात आले.
अवनीच्या अकाली मृत्यूमुळे केवल तिच्या कुटुंबातच नव्हे, क्रीडा जगतात आणि संपूर्ण समाजात दुःख आणि संतापाची लाट पसरली आहे. अवनी ही एक सामान्य खेळाडू नसून, एक प्रतिभावान राष्ट्रीय स्तरतील सेपक टकरा खेळाडू होती. तिने सात ते आठ वेळा राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये नागपूरचे प्रतिनिधित्व केले आणि प्रत्येक वेळी पदके जिंकली. तिने राष्ट्रीय स्तरतील स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व चार ते पाच वेळा सुवर्णपदके जिंकली. तिने ‘खेलो इंडिया’ सारख्या राष्ट्रीय व्यासपीठांवर आपले कौशल्य दाखवले होते.
अवनीच्या मृत्युमुळे रस्ते सुरक्षा आणि पोलिसांच्या कारवाईवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आर्थिक अडचणी नसूनही राष्ट्रीय सुवर्णपदक जिंकून आपल्या शहराला आणि राज्यला गौरव मिळवून देणाऱ्या मुलीच्या कुटुंबाला आता न्यायासाठी आवाज उठवण्यास भाग पडले आहे. वसीम खान यांनी कुटुंबाला न्याय मिळावा आणि या प्रकरणात कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी केली.
















