मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या हरिदासला मिळाली नई दिशा
लोकवाहिनी न्यूज
नागपूर: परिस्थितीने दोन्ही पाय हिरावून घेतले, पण स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे स्वप्न मात्र हिरावून घेता आले नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी हैदराबादहून नागपूर गाठले. हाताला काम मिळेल, चार पैसे कमावता येतील आणि कोणापुढेही मदतीसाठी हात पसरावा लागणार नाही, अशी एक छोटीशी आशा मनात होती. मात्र, दिव्यांगत्वामुळे रोजगाराचे दरवाजे उघडत नव्हते. अखेर रेल्वे क्लब चौकात एका सहकाऱ्यासोबत मदतीच्या प्रतीक्षेत दिवस काढण्याची वेळ आली. अशाच एका दिवशी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नजर हरिदास बिरादर याच्यावर पडली आणि त्याच्या आयुष्याला नवे वळण मिळाले.
हरिदासचे वय अवघे ३४ वर्षे. घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची. वडील ऑटो चालवतात, तर आई दूसरोंच्या घरी धुणीभांडी आणि घरकाम करून संसाराला हातभार लावते. अशा परिस्थितीत कुटुंबावर ओझे होण्यापेक्षा स्वतःच्या हमीतीवर काहीतरी करून दाखवावे, या जिद्दीने तो रोजгаाराच्या शोधात नागपूरला आला. मात्र, दोन्ही पायांनी दिव्यांग असल्याने काम मिळण्यासाठी त्याला पदोपदी अडचणींचा सामना करावा लागला. अपेक्षित रोजगार न मिळाल्याने काही दिवस लोकांनी स्वेच्छेने केलेल्या मदतीवर गुजराण करावी लागली.
जिलाधिकारी कुमार आशीर्वाद विविध कामानिमित्त रेल्वे क्लब चौकातून जात असत. तेव्हा हरिदास अनेकदा त्यांच्या नजरेस पडायचा. मात्र, एका दिवशी त्यांनी केवळ गाडीतून पाहून पुढे जाण्याऐवजी आपली गाडी थांबवली. खाली उतरून त्याच्याजवळ गेले. त्याची आस्थेने चौकशी केली. त्याच्या अडचणी जाणून घेतल्या. संवाद साधताना हरिदासच्या बोलण्यातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे त्याला केवळ आर्थिक मदत नको होती, तर स्वतःच्या कष्टाने जगण्याची संधी हवी होती.
हरिदासने एका सहकाऱ्याच्या मदतीने डिलिव्हरी बॉयेचे काम करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, त्यासाठी दुचाकी आवश्यक होती. त्याची ही गरज आणि स्वावलंबी होण्याची जिद्द जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाला भिडली. त्यांनी त्याला मदतीचे आश्वासन दिले. दिलेला शब्द पाळत बुधवार्र्त जिल्हाधिकारी कार्यालय बोलावून हरिदासला नवी कोरी स्कूटी भेट दिली. स्कूटीच्या चाव्या हातात पडल्या, तेव्हा हरिदाससाठी ती केवळ दुचाकी नव्हती. ती होती स्वतःच्या पायावर उभे राहण्याच्या स्वप्नाची पहिली पायरी! आजवर मदतीच्या प्रतीक्षेत बसणाऱ्या हातांना आता कष्टाने कमावण्याचा आधार मिळाला होता.
मदत नव्हे, स्वाभिमानाने जगण्याची संधी
जिलाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी हरिदासला केवळ आर्थिक मदत देऊन आपली जबाबदारी संपवली नाही. त्याच्या अडचणी समजून घेतल्या, त्याच्या मनातील स्वावलंबनाची इच्छा ओळखली आणि त्याला रोजगाराची वाट खुळी करून दिली. मदतीसाठी थांबलेल्या एका तरुणाच्या हातात त्यांनी कष्टाने कमावण्याचे साधन दिले. एखाद्याच्या वेदना समजून घेण्यासाठी मोठे पद नव्हे, तर संवेदनशील मन लागते. त्यांच्या या कृतीतून माणुसकीचा हाच जिव्हाळा अधोरेखित झाला.
जिलाधिकारी यांच्या या संवेदनशील पुढाकारामुळे त्याच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद शब्दांपलीकडचा होता. ‘आता स्वतःच्या हमीतीवर काम करून जगता येईल. कोणावर अवलंबून राहण्याची वेळ येणार नहीं,’ अशी भावना हरिदासने व्यक्त केली.
















