पाण्याच्या मागणीत वाढ; आजही अवलंबिता केवळ धरणांवर
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : नागपूर शहराच्या वाढत्या पाण्याच्या गरजेसोबत भविष्यातील जलसुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर होत असताना नागपूर महापालिकेची पर्यायी जलव्यवस्था मात्र अजूनही कागदावरच असल्याचे चित्र आहे. शहराला दररोज मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज असताना नवेगाव खेरी, तोतलाडोह आणि कामठी खेरी या प्रकल्पांवर पाणीपुरवठ्याचा मोठा भार आहे. यंदा पावसाने ओढ दिल्याने उपलब्ध जलसाठ्याचा काटकसरीने वापर करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे, मात्र अशा परिस्थितीत भविष्यातील संकट टाळण्यासाठी महापालिकेने कोणती पर्यायी व्यवस्था उभी केली, हा सवाल आता ऐरणीवर आला आहे.
नागपूर महापालिका आणि अन्य नळ ठिकाणांच्या पाणीपुरवठ्यासाठी दरवर्षी जलसंपदा विभागाकडून पाण्याचे आरक्षण करावे लागते. पिण्याच्या पाण्यासाठी ११२ दलघमी स्थायी, तर ७८ दलघमी अस्थायी आरक्षण असल्याची माहिती आहे. ऑगस्ट २०२७ पर्यंत नागपूरसह अन्य नळ ठिकाणांसाठी सुमारे २५१ दलघमी पाण्याची गरज भासणार असल्याचे अंदाज आहे. सध्या तीन प्रकल्पांमध्ये ७२०.४९० दलघमी पाणीसाठा उपलब्ध असल्याचे सांगितले जाते, त्या आलाच १८९ दलघमी मृतसाठा आहे.
३५ टक्के गळतीत
पाण्यातील उपसलेल्या एकूण पाण्यापैकी सुमारे ३५ टक्के पाणी गळती किंवा चोरीमुळे वाया जात असल्याचे सरकारी आकडेवारी आहे. जलअभ्यासकांच्या मते हा आकडा ४० टक्क्यांपर्यंत असण्याची शक्यता आहे. पाण्याची उपलब्धता मर्यादित असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी व्यवस्थापन वेळेत होणार नसेल, तर नवीन स्रोत शोधण्यापूर्वी उपलब्ध पाणी वाढविण्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे. गळती नियंत्रण, पाणीगळती रोखणे आणि जलवाहिनीचे आधुनिकारीकरण याबाबत ठोस परिणाम दिसत नसतील तर शहराच्या जलसंस्थेवर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. नागपूरकरांची तहान धरne भागवतात, पण नागपूरची भविष्यातील तहान भागविण्याची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न आहे. आजच पाणीसाठा उभीची हमी नाही, पावसाचे बदलते स्वरूप आणि वाढती मागणी लक्षात घेते महापालिकेला आता पर्यायीकडे विचार करण्याची वेळ आली आहे.
सध्या पुरेसा जलसाठा धरणांमध्ये आहे. मात्र साठा अहे म्हणून उपाययष्टी करा, असा अर्थ होत नाही. हवामानातील बदल आणि पावसाचे प्रमाण पाहता दीर्घकालीन उपाय करणे गरजेचे राहणार आहे.
डॉ. प्रवीण महाजन
जलतज्ज्ञ












