बडगामच्या जंगलात सुरक्षादलांकडून संयुक्त कारवाई
लोकवाहिनी न्यूज
श्रीनगर : पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख संशयितांपैकी एक असलेला लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी मोहम्मद आसिफ उर्फ हाशिम मूसा मंगळवारी मध्यरात्री सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ठार झाला.
जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील जंगल परिसरात भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन कोराग’ राबवले होते. सुरक्षा दलांनी बुधवारी सकाळी बडगाममधील पलमैदान परिसरात राबवलेल्या शोधमोहिमेदरम्यान हाशिम मूसा याचा मृतदेह आणि युद्धसामग्री जप्त केली. श्रीनगरस्थित चिनार कॉर्पने मूसा ठार झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. चिनार कॉर्पने ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिलेल्या माहितीनुसार, पलमैदान परिसरात सकाळी सुरू असलेल्या शोधमोहिमेदरम्यान पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी मोहम्मद आसिफ उर्फ हाशिम मूसा याचा मृतदेह आणि युद्धासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले.












