भाजपच्या पदयात्रेला वडेट्टीवारांचे प्रत्युत्तर
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : लोकशाहीची हत्या करणारे सत्ताधारी आता लोकशाही वाचवा म्हणून मोर्चा काढत आहेत. सत्तेत बसून अराजकता माजवणारे काँग्रेसकडे बोट दाखवत आहेत. राहुल गांधी सत्य बोलत आहेत म्हणून त्यांच्यावर टीका केली जाते, मात्र देशात अराजकता कोण निर्माण करत आहे, याचे उत्तर भाजपने द्यावे. हा तर रावणांचा मोर्चा आहे, असे म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज नागपुरात भाजपतर्फे काढल्या जाणाऱ्या अराजकता हटाव – लोकतंत्र बचाव मोर्चाची खिल्ली उडविली.
माध्यकांशी बोलताना वडेट्टीवार यांनी शेतकरी कर्जमाफ़ीच्या मुद्द्यावरून सत्ताध्याऱ्यांना सुनावले. दोन लाख रुपये कर्ज असलेल्या एकाही शेतकरीयाला सरकारने कर्जमाफी दिलेली नाही. ज्यांचे कर्ज सव्वा लाख, ९० हजार, ८० हजार किंवा ६० हजार रुपये आहे, त्यांचीच कर्जमाफी करण्यात आली आणि या माध्यमातून शेतकऱ्यांचा आकडा फुगवण्यात आला. ज्यांचे कर्ज डेढ़ लाखापेक्षा जास्त आहे, अशा शेतकऱ्यांची नाве विविध अटी व शर्ती लावून वगळण्यात आली आहेत. मी यादी घेऊन बसयाला तयार आहे, असा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.
विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले की, गोकुळच्या निवडणुकीत शेतकऱ्यांनी आपला कौल दिलेला आहे. मात्र सत्तेच्या जोरावर निवडून आलेल्या संचालकांना बाजूला ठेवण्याचे, त्यांना परराज्यात नेण्याचे आणि अध्यक्षपदाच्या निवडणुकीकी बहुमतचा खेळ बिघडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगावे की, संचालकांना बाहेर का नेण्यात आले? मतदानाचा अधिकार असलेल्या संचालकांना मतदानापासून दूर ठेवण्याचा हा प्रकार कशासाठी? १० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सर्व निवडून आलेल्या संचालकांना उपस्थित राहू द्या. बहुमताच्या आधारावर अध्यक्ष निवडला जाऊ द्या. मागच्या दारान सत्ता मिळवण्याचा हा प्रकार म्हणजे लोकशाहीचा अपमान आहे.
विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले की, गोकुळच्या लढाईत आम्ही सतेज पाटील यांच्या पाठीशी ताकदीने उभे आहोत. सभासदांनी दिलेल्या कौलाचा अनादर आम्ही खपवून घेणार नाही अशी टीका वेडेट्टीवार यांनी केली. महायुतीकडून लोकशाहीच्या तत्त्वांनाच हरताळ फासला जात आहे. जनतेने आणि दूध उत्पादक सभासदांनी निवडून दिलेला प्रतिनिधींच्या बहुमताचा अनादर करून संस्थेवर ताबा मिळवण्याचा कुटिल डाव आखला जात आहे. हा केवळ गोकुळ दूध संघाचा प्रश्न नाही, तर संपूर्ण सहकार क्षेत्राची स्वायत्तता आणि लोकशाही वाचवण्याची लढाई आहे.
गोकुळ निवडणुकीच्या वेळी सत्ताध्याऱ्यांनी त्यांचे संचालक तिथे हजर का राहू दिले नाहीत, त्यांना बाहेर का पाठवण्यात आले होते? असा सवाल करत वडेट्टीवार म्हणाले की, १३ हा आकडा बहुमताचा आहे आणि त्यांच्यापेक्षा एक सदस्य जास्त म्हणजे स्पष्ट बहुमत झाले. मात्र, जनतेने नकारलेल्यांना मागच्या दारान प्रवेश देण्याचा प्रयत्न गोकुळमध्ये सुरू आहे. तिथे लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरू.
देशाच्या एकात्मतेसाठी घातक
विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले की, देशात धार्मिक तेढ निर्माण करून मूळ प्रश्नांपासून जनतेचे लक्ष विचलित करण्याचे काम सुरू आहे. दििया मिर्झा यांनी मांडलेल्या भूमिकेवर त्यांच्या आडनावाचा आधार घेऊन टीका केली गेली आणि त्यांचा व्हीडीओ काढण्यात आला. एखाद्या व्यक्तीच्या आडनावावरून तिची भूमिका ठरवणे आणि हिंदू-मुस्लिम असा भेद निर्माण करणे ही देशाच्या एकात्मतेसाठी घातक बाब आहे.
विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले की, बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी प्रभू श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांवर आता भाजपमधील धर्मरक्षक कुठे लपून बसले आहेत? त्यावेळी देव, धर्म आणि हिंदूंच्या भावना दिसल्या नाहीत का? दुसऱ्यांनी काही बोलले की अंगावर धावून यायचं आणि भोंदू लोकांनी देवतांबद्दल अवमानकारक वक्तव्ये केली की गप्प बसायचं, हा दुःखीपणा कशासाठी? प्रभू श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण हे मत मिळवण्याचे किंवा देणाऱ्या गोळा करण्याचे साधन नाही. धर्माचा वापर सत्तेसाठी आणि राजकीय स्वार्थासाठी करू नये अशी सडकून टीका काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी केली.














