पलाश वासनिकच्या साळ्यासह तीन आरोपी अटक
लोकवाहिनी न्यूज नागपूर : बहिणीचा सततचा छळ आणि मारहाणीमुळे संतापलेल्या साळ्याने आपल्या दोन साथीदारांसह जावयाची हत्या केली. गुरुवारी (दि. १२) रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास मेडिकल चौकातील एका चहाच्या दुकानात ही खळबजनक घटना घडली. या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट-४ आणि अजनी पोलिसांनी मुख्य आरोपीसह तीन आरोपींना अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये चिंटू उर्फ आयुष दीपक धुपେ (२३), अथर्व दिनेश भगत (२०) आणि सुमेध शैलेश मेश्राम (२४) यांचा समावेश आहे. पलाश उर्फ गणी पराग वासनिक असे मृताचे नाव आहे. सर्व आरोपी नागपूरचे रहिवासी आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पलाशचे २०२० साली अंजली धुपेशोबत लग्न झाले होते. पलाशच्या गुन्हेगारीमुळे तिला लग्नाच्या एक वर्षानंतरच एका प्रकरणात तुरुंगात जावे लागले होते. यानंतर अंजली त्याच्यापासून वेगळी राहू लागली. कारागृहातून बाहेर आल्यानंतर पलाशने पत्नीशी वाद घालण्यास सुरुवात केली. गेल्या वर्षी पलाशने दुसरे लग्नही केले होते. आपल्या बहिणीसोबत झालेल्या गैरवर्तनामुळे आयुषचा पलाशवर राग होता.

















