लोकवाहिनी न्यूज नबी दिल्ली : काँग्रेस नेते आणि लोकसभातील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत आपला फोन टॅप केला जात असल्याचा आरोप केला आहे. माझ्या फोनवर पाळत ठेवली जात असून, मी केलेल्या सर्व आरोपांचे पुरावे माझ्या फोनमध्ये आहेत. त्यामुळे सरकारकडून माझा फोन टॅप केला जात असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला.
गेल्या काही काळापासून राहुल गांधी केंद्रातील भाजप सरकारवर सततने टीका करत आहेत. कधी एसआयआर, तर कधी निवडणुकीतील गैरप्रकारांचा मुद्दा उपस्थित करत ते केंद्र सरकारवर आरोप करत आहेत. फोन टॅपिंगच्या मुद्द्यावर बोलताना राहुल गांधी म्हणाले की, त्यांनी केलेल्या सर्व आरोपांचे पुरावे त्यांच्या फोनमध्ये आहेत. त्यामुळे केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर त्यांचा फोन टॅप केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत समोरासमोर खुल्या चर्चेच्या मुद्द्यावरही राहुल गांधी यांनी भाष्य केले, अशा चर्चेत कोण परकीय शक्तींच्या इशाऱ्यावर काम करत आहे आणि कोण देशविरोधी आहे, हे आपण सिद्ध करून दाखवू शकतो. यासंदर्भातील अनेक महत्त्वाची माहिती आपल्या फोनमध्ये असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळेच आपला फोन टॅप केला जात असल्याचे राहुल म्हणाले. राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समोरासमोर चर्चेचे आव्हान दिले.
राहुलने मानसिक आरोग्य तपासावे; भाजपचा सल्ला
नबी दिल्ली : राहुल गांधी यांच्या फोन टॅपिंगच्या आरोपाला आपने सडेतोड प्रत्युत्तर दिले असून, त्यांचे आरोप साफ फेटाळून लावले आहेत. राहुल गांधींनी स्वतःच्या मानसिक आरोग्याची तपासणी करून घ्यावी, असा सल्लाही आपने दिला. केरळ भाजपचे अध्यक्ष राजीव चंद्रशेखर यांनी फोन टॅपिंगचा दावा फेटाळताना म्हटले की, मी राहुल गांधींना पूर्ण आदराने एवढेच सांगू इच्छिते की, त्यांनी आपल्या मानसिक आरोग्याची तपासणी करून घ्यावी. कोणीही त्यांचा फोन टॅप करण्याची तसदी घेत नाही. कोणालाही त्यांचा फोन टॅप करण्यात रस नाही. जर कोणाला रस असेल, तर तो फक्त हे समजून घेण्यात आहे की त्यांचे विचार दिवसेंदिवस खोट्या गोष्टीवर का आधारित असतात. आपने यापूर्वी पंतप्रधान मोदींससोबत चर्चेची राहुल यांची मागणी फेटाळली होती.















