उत्तर भारतीय आणि मराठी समाजात वाद निर्माण केल्याचा आरोप
लोकवाहिनी न्यूज मुंबई : मुंबईतील काही रेलवे स्थानकांवर भोजपुरी गाणी वाजवण्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण সেনेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर (भाजप) जोरदार टीका केली आहे. उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप महाराष्ट्रात मराठी आणि उत्तर भारतीय समाजामध्ये वाद निर्माण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजप ‘फोडा आणि राज्य करा’ या नीतीने राजकारण करत असल्याचे ठाकरे म्हणाले. दुसरीकडे, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्त अजय आलोक यांनी ठाकरे बंधूवर टीका करत छठपूजेवर टिप्पणी केल्यास गंभीर परिणाम होतील, असा इशारा दिला आहे.
भोजपुरी गाण्यांवरून राजकारण तापले
मुंबईतील काही रेलवे स्थानकांवर छठपूजेच्या पार्श्वभूमीवर भोजपुरी गाणी वाजवण्यात आली होती. वरून वाद निर्माण झाला. रेलवेच्या उद्घोषणा यंत्रणेचा वापर गाणी वाजवण्यासाठीचा केला जात आहे, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला होता. मनसेने या प्रकारणाला विरोध केला आणि भोजपुरी गाणी वाजवण्याच्या प्रयत्न थांबवल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला. राज ठाकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत भाजपने निशाणा साधला. भाजप आणि त्यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावरून छठपूजेच्या परंपरांचे व्हिडिओ प्रसारित केले जात आहेत. या माध्यमातून महाराष्ट्रात सांस्कृतिक संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी म्हटले.
मराठी माणसांविळोधात इतर समाज
उत्तर भारतीय आणि गुजराती समाजातील नागरिकांनी भाजपचे राजकारण समजून घ्यावे, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले. भाजप आपल्या राजकीय फायद्यासाठी या समाजांना मराठी माणसांविळोधात उभे करत असल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्राची संस्कृती आणि ओळख यांना धक्का देण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. भाजप निवडणुका जिंकण्यासाठी वेगवेगळ्या समाजांमध्ये वाद निर्माण करते, असे ठाकरे म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या वेळी हिंदू-मुस्लिम वाद निर्माण केला जातो, तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी कबुतरखान्यात कबुतरांना दाणे पाण्याच्या मुद्द्यावरून गुजराती आणि मराठी असा वाद निर्माण करण्यात आला होता, असा आरोप त्यांनी केला.
निवडणूक आयोगावरही टीका
भाजपने आपल्या कामाच्या जोरावर निवडणुका जिंकता येत नाहीत. त्यामुळे समाजात संघर्ष निर्माण केला जात असल्याचे राज ठाकरे म्हणाले. निवडणुकीत भाजपच्या विजयासाठी निवडणूक आयोग महत्त्वाची भूमिका बजावत असल्याच्या टीकेही त्यांनी केली. मतदार याद्यांमध्ये फेरफार करून भाजपाला फायदा करून दिला जात असल्याचा आरोप विरोधकांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर केला है. ‘जेन जी’ आंदोलनातून प्रेरणा घेऊन केंद्र आणि राज्यांमधून भाजप सत्तेबाहेर करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचा दावाही ठाकरे यांनी केला. मराठी जनतेने भाजपने निर्माण केलेल्या वादामध्ये अडकू नये, असे आवाहन करत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याची आठवण करून दिली.
छठपूजेवर टिप्पणी केल्यास गंभीर परिणाम : अजय आलोक
राज ठाकरे यांच्या आरोपांवर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते अजय आलोक यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी ठाकरे बंधूवर टीका करत त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचे म्हटले. राज ठाकरे यांचे राजकारण संपले असून उद्धव ठाकरे यांची राजकीय वैभब कमी झाले आहे, अशी टीका त्यांनी केली. छठ हा केवळ बिहार किंवा पूर्वांचलपूरता मर्यादित सण नाही. जगभरातील भारतीय नागरिक हा सण साजरा करतात. न्यूयार्क, लंडन, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्येही छठपूजा केली जाते, असे आलोक यांनी सांगितले.
















