महापुरुषांच्या स्मारक स्वच्छतेसाठी पुढाकार
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली भारतीय पक्षातर्फे विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भारतीय जनता युवा मोर्चा, नागपूर महानगरच्या वतीने नागपूर शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांची व परिसराची स्वच्छता करून पर्यावरण संवर्धन व जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.
या अभियानांतर्गत रामनगर चौक, पश्चिम नागपूर येथील सेनापती नरहरी बाजीप्रभू देशपांडे महाराजांच्या स्मारकाची व परिसराची स्वच्छता करून अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. महानगरपालिकेच्या ‘मेगा क्लिननेस ड्राइव्ह’ अंतर्गत ५ ते २१ सप्टेंबर या कालावधीत भारतीय जनता युवा मोर्चा, नागपूर महानगरच्या वतीने शहरातील सर्व महापुरुष व क्रांतिकारकांच्या स्मारकांची स्वच्छता केली जाणार आहे. भारतीय जनता पक्ष, नागपूर शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली व भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर महानगर अध्यक्ष सचिन करारे यांच्या नेतृत्वात हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
नागपूर महानगरपालिका उपनेते नगरसेवक विनोद कन्हेरे, विनोदसिंग बघेल, परिणीता फुके, योगेश पाचपोर, युवा मोर्चा शहर महामंत्री रितेश पांडे, ऋषभ अरखेल, मंडळ अध्यक्ष अक्षय शर्मा, उदय मिश्रा, सौरभ शाहू, अजय मेश्राम, जय साजवानी, प्रतीक्षा घारडे, सतीश डागोर, विजय होले, सुनील हिरनवार, साधना बरडे, नरेश बरडे, स्वप्निल खडगी, रजत फातोंडे, भूपेंद्र मिश्रा, संदीपन शुक्ला, आर्यन ताकभवरे, मिताली केतलानी, निखिल कश्यप, यश गुप्ता, ईशान चौरसिया, दीपक ठाकरे, तुषार ठाकरे, अतुल कनोजिया, अमित पाठक, धनराज तेलंग, सुनील मौर्य, विजय चौरे, राहुल महाजन, अनिल आत्राम, आशु गुगावंकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या अभियानाच्या माध्यमातून स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि महापुरुषांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले.












