भाजयुमोचे अनोखे प्रतीकात्मक आंदोलन
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या राजकीय भूमिका आणि विधानांच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी नागपुरात आक्रमक पवित्र घेत एक अनोखे आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांचा एक प्रतीकात्मक पुतळा तयार करून तो थेट नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात ‘उपचारासाठी’ नेला. या आगळ्यावेगळ्या आंदोलनामुळे शहरात एकच चर्चा रंगली आहे.
नुकतेच भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली होती. यावेळी बोलताना त्यांनी राहुल गांधी यांचा ‘मेंदू चोरीला गेला आहे’, असे खोचक वक्तव्य केले होते. फडणवीस यांच्या याच वक्तўव्याचा धागा पकडत आणि त्यांच्या विधानाचे समर्थन करत भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी हे प्रतीकात्मक आंदोलन छेडले.
या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी मनोरुग्णालयाच्या परिसरात राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राहुल गांधी यांच्या राजकीय भूमिका, त्यांची विधाने आणि काँग्रेसच्या धोरणांचा निषेध नोंदवण्यासाठी त्यांच्या पुतळ्याला मनोरुग्णालयात दाखल करण्याचे हे नाट्य रंगवण्यात आले.
देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याच्या समर्थनार्थ आणि राहुल गांधी यांच्या राजकीय कार्यपद्धतीचा निषेध करण्यासाठी हे प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आल्याचे भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले. या आंदोलनामुळे नागपूरमधील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळाले.
युवक काँग्रेस विरुद्ध भाजयुमो वाद चिघळणार!
सोमवारी शहर काँग्रेसने निवडणूक आयुक्त ज्ञानेश्वर कुमार यांचा पुतळा जाळला होता. आज भाजयुमो कार्यकर्त्यांनी थेट राहुल गांधी यांचा पुतळा मनोरुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला.












