नाना पटोले यांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवण्याचा आणि मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा संपूर्ण कट हा तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी रचला गेला होता. आज सत्तेत असलेल्या मंडळीनीच माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना हाताशी धरून महाराष्ट्रात हे ‘फेक नॅरेटिव्ह’ उभे केले होते. त्या गाडीतील जिलेटिनच्या कांड्या नागपूरमधूनून आल्याची माहिती खुद सरकारनेंच विधानसभेत दिली होती, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी येथे बोलताना केला.
नागपुरात आज माध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले यांनी सचिन वाझे, अँटिलिया प्रकरण, केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग, निवडणूक आयोगाची मनमानी आणि होणारच होते. कारण हा संपूर्ण कट पूर्वानियोजित होता. परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांच्या माध्यमातून मविआ सरकार अस्थिर करण्यासाठी अंबानींच्या घराचा सहारा घेण्यात आला. मी स्वतः विधानसभाेत प्रश्न बारंबार उपस्थित केला होता. गाडीत ठेवण्यात आलेली जिलेटिन नागपूरमधून आणली गेली होती, अशी अधिकृत माहिती सरकारने सभागृहात दिली होती. मग हे जिलेटिन नागपुरातून कोणी पुरवले? त्यामागे कोणाता हात होता? गाडी लावणारा माणूस दोनच दिवसांत पाण्यात बुडून आत्महत्या करतो असा बनाव कसा रचला गेला? हे सर्व चित्र महाविकास आघाडीची प्रतिमा मलीन करण्यासाठी आणि सत्ता बळकावण्यासाठी तयार केले गेले होते.
आज परमबीर सिंग कुठे आहेत, यांचा पत्ता नाही आणि वाझे माफीचा साक्षीदार बनण्याच्या तयारीत आहे. यावरून स्पष्ट होते की, सत्तेत बसलेल्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी धरून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे मोठे पाप केले होते, असा आरोपही पटोले यांनी केला.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश्वर कुमार आणि निवडणूक आयोगाच्या ‘एसआरआर’ मोहिमेविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत पुकारलेल्या महामोर्चाला काँग्रेसचा पाठिंबा आहे का, या प्रश्नावर नाना पटोले यांनी भूमिका स्पष्ट केली, देशाची लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी जे जे लढा उभारतील, त्या सर्वांसोबत काँग्रेस खंबीरपणे उभी राहील. आज नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी निवडणूक आयोगाला उपलब्ध खिसाभरात ठेवून जनतेच्या मतांवर थेट दरोडा टाकण्याचे काम सुरू केले आहे. केवळ ज्ञानेश्वरकुमारांना हटवून चालणार नाही, तर या सर्व प्रकारामध्ये असणाऱ्या पंतप्रधान मोदींनाच पदच्युत करण्याची गरज आहे. त्यामुळे ४ ऑक्टोबरच्या मोर्यात काँग्रेस पूर्ण ताकदीने सहभागी होईल.
आमचे नेते राहुल गांधी यांनी स्वतः दिल्लीतील एका मतदान केंद्राची पाहणी केली. तिथे ६०० मतदारांच्या यादीत एकाच व्यक्तीचे नाव पुन्हा पुन्हा नोंदवले गेल्याचे उघड झाले. निवडणूक आयोग इतक्या खालच्या पातळीवर जाऊन काम करत असेल, तर हे लोकशाहीची हत्या करणारे पाप आहे, असा संताप त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात ‘एसआरआर’च्या नावाखाली मतदारांची नावे वंगळणे आणि बोगस मतदार नोंदणी करणे याविरोधात आता सर्वच विरोधी पक्ष रस्त्यावर उतरत असून, ४ ऑक्टोबरचा एल्गार ऐतिहासिक ठरेल, असा विश्वासही नाना पटोले यांनी व्यक्त केला. २४ ऑक्टोबर रोजी मुंबईत होणाऱ्या ठाकरे बंधूंच्या संयुक्त महामोर्चाबाबत काँग्रेसची अधिकृत भूमिका स्पष्ट केली.
डबल इंजिन सरकार पूर्णपणे फेल
महाराष्ट्र सरकार हे किती मदत करेल, हे माहिती नाही, हे डबल इंजिन सरकार हे पूर्णपणे फेल झालेलं सरकार आहे. हे सरकार कितपत शेतकऱ्यांना मदत करेल? कारण फडणवीसांनी दुष्काळ जाहीर केला, त्यामध्ये मदतीची भूमिका, त्यामध्ये एक भूमिका मांडली नाही. तर किती पैसे शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत, ही भूमिका मांडलेली नाही. म्हणून शेतकरी चिंतेत आहे.













