नागपूर परिमंडळ प्रथम; चिंधी बाजार उपविजेता
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : रंगमंचावरील कलागुणांचा अद्भुत आविष्कार, कलाकारांचा सळसळता उत्साह आणि प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अशा अत्यंत भारवून टाकणाऱ्या वातावरणामध्ये महावितरणच्या नागपूर प्रादेशिक आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धा २०२६ चा सोहळा पार पडला. या दोन दिवसीय नाट्यकोत्सव नागपूर परिमंडळाच्या ‘थलाई कुथल’ या नाटकाने आपल्या उत्कृष्ट অভিনयाने आणि प्रभावी सादरीकरणाने रसिकांची मनं जिंकत सर्वोत्कृष्ट नाटकाचा बहुमान मिळविला, तर अकोला परिमंडळाच्या ‘चिंधी बाजार’ या नाटकाने उपविजेतेपदाचा बहुमान मिळवला.
या स्पर्धेचे पारितोषिक वितरण महावितरणचे संचालक (संचलन) धनंजय आंडेकर आणि कार्यकारी संचालक (नियोजन व ई-वाहन चार्जिंग स्टेशन्स) प्रसाद रेश्मे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या सोहळ्याला नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक तथा नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता राजेश नाईक, मुख्य अभियंता दिलीप दोडके, दत्तात्रय बनसोडे आणि हरिश गजभये यांच्यासह स्पर्धेचे परीक्षक प्रसिद्ध रंगकर्मी महेश पातुरकर, विवेक खेर आणि मीनाक्षी बोरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी बोलताना संचालक धनंजय आंडेकर यांनी, स्पर्धेत जय-पराजय होत असतो, ज्यांना यश मिळाले नाही त्यांनी निराश न होता पुढील वर्षी अधिक नव्या उर्जेने उतरावचे, या मंचावरून घडणारे कलाकार उद्या संपूर्ण महाराष्ट्रात महावितरणचे नाव उज्ज्वल करतील अशा शुभेच्छा दिल्या. कार्यकारी संचालक प्रसाद रेश्मे म्हणाले की, कलेचे सादरीकरण करताना कलाकाराने अनुभवलेला आनंद आणि रसिकांच्या चेहऱ्यावर फुललेले हास्य हेच कोणhatही कलाकाराचे खरे आणि सर्वात मोठे पारितोषिक असते. आयोजक व प्रभारी प्रादेशिक संचालक राजेश नाईक यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी केवळ विजेचेच नाही तर आपल्या अभिनयाचीही रोशनीई मंचावर पसरवली असून सादर झालेल्या प्रत्येक नाटकाने समाज़ाला एक सुंदर आणि सकारात्मक संदेश दिल्याची आनंद व्यक्त केला, तसेच ज्येष्ठ रंगकर्मी व परीक्षक विवेक खेर यांनी आपल्याच कर्मचाऱ्यामधील कलागुणांना वाव देऊन कुटुंबसारखे जपणाऱ्या महावितरण परिवाराचे कौतुक केले.
.नाटकाने सर्वोत्कृष्ट नाटकाचा प्रथम पुरस्कार पटकावला, तर अकोला परिमंडळाच्या ‘चिंधी बाजार’ नाटकाने द्वितीय क्रमांक मिळवला. दिग्दर्शन क्षेत्रात ‘थलाई कुथल’ नाटकासाठी प्रफुल लांडे यांनी प्रथम, तर ‘चिंधी बाजार’ नाटकासाठी संजय पुरस्कार यांनी द्वितीय पारितोषिक जिंकले. उत्कृष्ट पुरुष অভিনयासाठी ‘थलाई कुथल’ मधील भूमिकेसाठी प्रशांत मडावी यांना प्रथम आणि ‘चिंधी बाजार’ मधील भूमिकेसाठी रोशन समदुरे यांना द्वितीय पुरस्कार मिळाला.
उत्कृष्ट स्त्री অভিনयात ‘चिंधी बाजार’ मधील भूमिकेसाठी सुप्रिया छुटके प्रथम, तर ‘एक होती राणी’ मधील भूमिकेसाठी रोहिणी ठाकरे द्वितीय ठरल्या. नेपथ्यासाठी ‘गुलाम’चे सुधीर खुजनारे प्रथम तर ‘एक होती राणी’चे रमेश मानकर द्वितीय राहिले. प्रकाश योजनेत ‘थलाई कुथल’चे जयंत बाणेरकर प्रथम व ‘चिंधी बाजार’चे अजितपाल सिंह दिनोरे द्वितीय ठरले. पार्श्वसंगीतासाठी ‘थलाई कुथल’च्या अमित पेडेकर यांनी प्रथम तर ‘एक होती राणी’च्या असित डाळकनेर आणि डॉ. अविनाश आचार्य यांनी द्वितीय पारितोषिक मिळवले. रंगभूषा-वेशभूषा विभागात ‘थलाई कुथल’च्या अनुश्री पांडे आणि स्वाती फाटे यांनी प्रथम तर ‘एक होती राणी’च्या प्रविण बिसन आणि अरविंद कालकर यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.
दोन दिवस दर्जेदार नाटकांची अनुभूती
या दोन दिवसांच्या नाट्योत्सवात प्रेक्षकांना एकाहून एक सरस, आशयघन आणि दर्जेदार नाटकांची अनुभूती घेता आली. यामध्ये अकोला परिमंडळातर्फे ‘चिंधी बाजार’, अमरावती परिमंडळातर्फे ‘गुलाम’, नागपूर परिमंडळातर्फे ‘थलाई कुथल’ आणि चंद्रपूर परिमंडळातर्फे ‘एक होती रानी’ या नाटकांचे प्रयोग रंगले. या सोहळ्यासाठी नागपूर, अकोला, अमरावती, चंद्रपूर आणि गोंदिया या सर्व परिमंडळांतून आलेले वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि नाट्यप्रेमी मोठ्या संखेने उपस्थित होते













