प्रतिबंधित सुगंधी तंबाखू जप्त
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : सदर भागातील हिचकी बार ॲण्ड रेस्टॉरंटमध्ये कारवाई करणाऱ्या पोलिस आयुक्तांच्या पथकाने पुन्हा एकदा शहरात दोन ठिकाणी छापे घातले आहेत. या छाप्यांमध्ये प्रतिबंधित तंबाखুজजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली आहे.
पोलिस आयुक्तांच्या एस्कॉर्ट पथकाने दोन वेगवेगळ्या छाप्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित सुगंधी तंबाखুজजन्य पदार्थ, गुटखा तसेच खर्सा बनवण्याची मशिन जप्त केली. या कारवाईत एकूण १ लाख १८ हजार ८७६ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली कारवाई वाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. एस्कॉर्ट पथकाचे अधिकारी व अंमलदार पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नागरिक गृहनिर्माण सोसायटी, सोनवा नगर, खडकगाव रोड परिसरातील अन्नपूर्णा अनाज भंडार या किराणा दुकानाच्या गोदामावर पंचांसमक्ष छापा टाकण्यात आला. वेळी अशोक गोपालभव कडू (वय ४५, रा. गाव पिंगावामाळ, ता. जि. पांढुर्णा, मध्य प्रदेश) हा आढळून आ
गोदामाची झडती घेतल्यावर विमल, राजश्री, पानपराग, केपी ब्लॉक, किंग, डबल ब्लॉक आदी प्रतिबंधित सुगंधी तंबाखूजन्य पदार्थांचा साठा आढळला. पोलिसांनी कडू यांच्याकडून २२ हजार रुपये रोख आणि ३३ हजार ९५६ रुपयांचा तंबाखूजन्य मुद्देमाल, असा एकूण ५५ हजार ९५६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी वाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
दुसरी कारवाई मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बोखारा रोडवरील गोधनी रेल्वे पुलाजवळ करण्यात आली. गोल्ड पान सेंटर आणि कान्हा पान पॅलेस येथे पंचांसमक्ष छापा टाकण्यात आला. या कारवाईत दुर्गादास नारायणदास मलवे आणि योगेश ज्ञानेश्वर बांधे यांच्या ताब्यातून प्रतिबंधित सुगंधी तंबाखুজजन्य पदार्थ, गुटखा तसेच खर्सा बनवण्याची मशीन असा ६२ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिस आयुक्त विश्वास नांंगरे पाटील यांच्या मार्गदर्शनखाली ही कारवाई करण्यात आली.
अन्न सुरक्षा विभागही सरساवला
गुन्हे शाखेच्या युनिट तीनने लकडगंज परिसरातील टेलीफोन एक्सचेंज चौक, मेट्रो स्टेशनजवळील भाऊ पान पॅलेस ॲण्ड कोल्ड्रिंक्स सेंटरमधून सुगंधी तंबाखू जप्त केला. भाऊराव मनोहर खापेकर (वय ४३, रा. प्लॉट क्र. ०१, टेलीफोन एक्सचेंज चौक, लकडगंज) यांच्याकडून पथकाने १५.५ किलो खर्सा, डायरेक्टर पान मसाला, पान बहार पान मसाल्याचा साठा जप्त केला. अन्न सुरक्षा अधिकारी अखिलेश दामोदर राऊत (वय ४७) यांच्या तक्रारीवरून लकडगंज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
वरिष्ठांचे मार्गदर्शन
ही कारवाई पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सह पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र दाभाडे, पोलिस उप आयुक्त (डिटेक्शन) दीपक अग्रवाल आणि सह. पोलिस आयुक्त (गुन्हे शाखा) वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. अतुल मोहनकर व त्यांच्या पथकाने केली.













