जनसंवाद विभागात कॅम्पस बुलेटिनचे अनावरण
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : पत्रकारांनी नैतिक मूल्ये जोपासत, संवेदनशीलपणे दूरगामी परिणाम लक्षात घेत जबाबदारीने लिखाण करावे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर जनसंवाद विभागात नवप्रवेशित विद्यार्थ्यांचा दीक्षारंभ तसेच ‘कॅम्पस’ बुलेटिन अनावरण कार्यक्रम सोमवार, दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी पार पडला. जनसंवाद विभागाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर मार्गदर्शन करीत होत्या.
कार्योंक्रमाचे अध्यक्षस्थान कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांनी भूषविले, यावेळी विभाग प्रमुख डॉ. धर्मेश धवणकर, मंजूषा जोशी, आनंद भिसे, डॉ. गणेश खक्से, डॉ. योगेश पांडे यांची उपस्थिती होती. माध्यमांनी दिलेल्या माहितीचा समाजमानावर अधिक परिणाम होत असून नैतिकमूल्ये लक्षात घेत पत्रकारितेत विद्यार्थी जनमाणसांपर्यंत जबाबदाराने योग्य माहिती पोहोचवावी, असे आवाहन डॉ. क्षीरसागर यांनी पुढे बोलताना केले.
बातमी अधिक प्रभावी आणि वाचनीय करण्यासाठी त्यात योग्य प्रकारे ‘तडका’ असणे आवश्यक असला तरी हा ‘तडका’ तत्त्वांवर आधारित असावा आणि त्यातून समाजहित साधले गेले पाहिजे. मीडिया ट्रायल आणि पीत पत्रकारितेचे दुष्परिणाम स्पष्ट करताना त्यांनी बातम्यांमध्ये अचूकता, सत्यता आणि विश्वासार्हतेचे महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यापीठातील परीक्षेशी संबंधित घटनांचा उल्लेख केला. सदर प्रकरणात एखादी गोष्ट सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या हितची किंवा योग्य वाटत असली, तरी संपूर्ण परिस्थिती समजून घेतल्याशिवाय त्याचे मूल्यमापन करू नये, असा संदेश त्यांनी दिला. योग्य-अयोग्य ठरविण्यापूर्वी घटनेची संपूर्ण बाजू समजून घेणे आवश्यक आहे, असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
जनसंवाद विभागातील आपण जबाबदार विद्यार्थी असून संवेदनशील तेथून उत्कृष्ट समाजकार्य देखील करता येते. समाजात असलेल्या विविध समस्यांकडे लक्ष वेधत आपणास कशा प्रकारचे पत्रकार व्हायचे हे तुम्ही ठरवा. माध्यम क्षेत्रात करिअर निकडत असताना योग्य नियोजन करा, असे कुलगुरू म्हणाल्या. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात डॉ. क्षीरसागर यांनी माध्यम क्षेत्रातील विविध महत्वाच्या विषयांवर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. नवप्रवेशित विद्यार्थ्यांना यावेळी कुलगुरूंनी शुभेच्छा दिल्या. नव्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासोबतच विभागाच्या कॅम्पस बुलेटिनचे अनावरण प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाची सुरवात डॉ. मनाली क्षीरसागर यांच्या सत्कारने झाली. पारंपरिक विभाग प्रमुखूंकडून प्रमुख पाहुण्यांचा सत्कार न करता विभाग प्रमुख डॉ. धर्मेश धवणकर यांनी विद्यार्थ्यांना सत्कार करण्याची संधी दिली. विभागाची कार्यपद्धती ‘विद्यार्थ्यांसाठी आणि विद्यार्थ्यांकडून’ या संकल्पनेवर आधारित असल्याचे त्यांनी खातून अधोरेखित केले. आकसा बागसरायवाल यांनी कुलगुरूंना शाल अर्पण केली, तर मानसी तुमडाम यांनी रोप आणि जान्हवी कचोरे यांनी श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला.
तृतिय सत्रातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कॅम्पस बुलेटिनचे डॉ. मनाली क्षीरसागर आणि विभाग प्रमुख डॉ. धर्मेश धवणकर यांच्या हस्ते औपचारिक अनावरण करण्यात आले. या बुलेटिनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्जनशीलतेचे आणि कौशल्याचे प्रदर्शन करण्याची संधी मिळाली. कार्यक्रमाचे संचालन गुरजोत सिक्कल यांनी केले तर आभार ईशा शितोरकर यांनी मानले.













