वेदनामुक्त जीवनाच्या दिशेने एक नवे पाऊल
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : वोक्हार्ट हॉस्पिटल्स शंकर नगर येथे १९ नोव्हेंबरपासून रोबोटिक टोटलनी रिप्लेसमेंट मोहिमेचा प्रारंभ झाल्याची माहिती वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूरचे केंद्र प्रमुख डॉ. सौरभ नागर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
याप्रसंगी डॉ. नागर यांनी सांगितले की, या मोहिमेच्या माध्यमातून गुडघेदुखीचा त्रास असणाऱ्यांना पुन्हा एकदा सहजपणे चालण्या-फिरण्याचा आनंद घेण्याची संधी मिळणार आहे.
या उपक्रमाचा उद्देश दीर्घकाळ गुडघेदुखीचा त्रास असलेल्या, गुडघ्यांच्या सांध्यांची झीज (ऑस्टिओआर्थरायटिस), गुडघे आखडणे आणि दैनंदिन कामे करताना अडचणी येणाऱ्या रुग्णांना आधुनिक गुडघा प्रत्यारोपण उपचार उपलब्ध करून देणे आहे.
या मोहिमेत वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूर येथील ऑर्थोपेडिक्स आणि रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन तज्ज्ञ डॉ. रोमिल राठी आणि डॉ. मुकुंद अग्रवाल रुग्णांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या अनुभवाच्या आणि वैद्यकीय कौशल्याच्या मदतीने रुग्णांना योग्य उपचार पर्याय समजून घेता येतील. रोबोटिक तंत्रज्ञानाच्या मदतीने केली जाणारी टोटल नी रिप्लेसमेंट (गुडघा प्रत्यारोपण) शस्त्रक्रिया ही डॉक्टरांचे कौशल्य आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम आहे. या तंत्रज्ञानामुळे प्रत्येक रुग्णाच्या गुडघ्याची रचना लक्षात घेऊन शस्त्रक्रियेचे नियोजन करता येते. तसेच या तंत्रज्ञानामुळे हाडांची योग्य पद्धतीने तयारी करणे, प्रत्यारोपित सांधा अचूक जागी बसवणे आणि गुडघ्याचे योग्य संतुलन राखणे यासाठी डॉक्टरांना मदत होते. हे सर्व रुग्णाच्या वैद्यकीय गरजांनुसार केले जाते. या मोहिमेचा लाभ ३१ मार्च २०२७ पर्यंत घेता येईल. यासाठी लागू असलेल्या अटी व शर्ती तसेच रुग्णाची वैद्यकीय स्थिती आणि उपचारांची आवश्यकता विचारात घेतली जाईल, अशी माहिती डॉ. सौरभ नागर यांनी दिली.
















