भाजपाचे विविध राज्यांचे प्रभारी, सहप्रभारी जाहीर
लोकवाहिनी न्यूज
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने राज्य प्रभारी आणि सहप्रभाऱ्यांची यादी जाहीर केली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्षात साईडलाईन झालेल्या स्मृती इराणी यांच्याकडे हरियाणा आणि छत्तीसगडची जबाबदारी सोपवण्यात आली असून, विनोद तावडे यांची उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या प्रभारीपदी बैजयंत जय पांडा यांची नियुक्ती झाली असून, अमित मालवीय, सदानंद तनावाडे आणि कमलजीत सहरावत हे सहप्रभारी राहतील. सुनील बंसल यांच्याकडे पश्चिम बंगाल आणि तेलंगणाची जबाबदारी देण्यात आली असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विश्वासू राम माधव हे उत्तराखंडचे नवे प्रभारी, तर बांसुरी स्वराज सहप्रभारी असतील.
माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांना दिल्ली भाजपचे प्रभारी पद देण्यात आले आहे, जमयांग नामग्याल आणि दर्शना दरदोश यांना सहप्रभारी पदाची जबाबदारी दिली गेली आहे. संजय भाटिया यांच्याकडे राजस्थानचा प्रभार सोपवण्यात आला आहे, तर कविता पाटीदार आणि कुलजीत चहल यांना सहप्रभारी पद देण्यात आले आहे.
विनोद तावडे, विनय सहस्रबुद्धे यांच्यासोबत महाराष्ट्रातील दोन महिला नेत्यांवर भाजपने मोठी जबाबदारी सोपवली आहे.













