खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे आयोजन
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांचा गड-किल्ल्यांचा गौरवशाली इतिहास, शौर्य आणि स्थापत्यवैभव नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासोबतच सर्जनशीलतेला आणि सांस्कृतिक वारसाच्या जपणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी खासदार सांस्कृतिक महोत्सवतर्फे ‘खासदार शिव किल्ले स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे. दीपावलीच्या पर्वावर होणाऱ्या या स्पर्धेत पर्यावरणपूरक व पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्याचा वापर करून किल्ले साकाराण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अशी माहिती खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे सचिव जयप्रकाश गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या स्पर्धेसाठी शालेय व खुला असे दोन गट करण्यात आले आहेत, या दोन्ही गटासाठी शिव किल्ले आणि काल्पनिक किल्ले असे दोन विषय ठेवण्यात आले आहेत. या स्पर्धेसाठी इच्छुकांना १ ते १५ ऑक्टोबरदरम्यान नोंदणी करता येणार आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून कला, साहित्य, संस्कृती, परंपरांचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने दरवर्षी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले जाते. याच अनुषंगाने मागील वर्षांपासून किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. पहिल्याच वर्षी या स्पर्धेला उदंड प्रतिसाद लाभला, त्यामुळे यावर्षी अधिक मोठ्या प्रमाणावर ही स्पर्धा घेतली जाणार आहे.
किल्ला तयार करण्याची इच्छा असलेल्या स्पर्धकांना दोन ते तीन दिवसांचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे. स्पर्धकांनी तयार केलेल्या किल्ल्यांचे १२ ते १५ नोव्हेंबर दरम्यान परीक्षकांद्वारे परीक्षण केले जाईल. पर्यावरणपूरक व पुनर्वापर करता येण्या-या साहित्याचा वापर करून किल्ले तयार करण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल.
भरघोस बक्षिसे जिंकण्याची संधी
या स्पर्धेतील दोन्ही गटातील विजेत्यांना भरघोस बक्षिसे दिली जाणार आहेत. प्रथम क्रमांकासाठी ५१,०००, द्वितीय ३१,००० तर तृतीय क्रमांकासाठी २१,००० चे बक्षीस राहील. पाच प्रोत्साहनपर बक्षिसे दिली जाणार असून त्यांना प्रत्येकी ५,००० ची राशी दिली जाणार आहे.
या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन तसेच, गणेशोत्सव, शारदोत्सव, दुर्गोत्सवामध्ये मंडळांना विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी प्रोत्साहन केले जाते. याच अनुषंगाने मागील वर्षांपासून किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. पहिल्याच वर्षी या स्पर्धेला उदंड प्रतिसाद लाभला, त्यामुळे यावर्षी अधिक मोठ्या प्रमाणावर ही स्पर्धा घेतली जाणार आहे.
खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्यावतीने यावेळी करण्याकत आले. नावे नोंदणीकरिता व अधिक माहितीकरिता नितीन गडकरी यांचे जनसंपर्क कार्यालय, पहिला माळा, गडकरी वाडा, महल, नागपूर येथे १ ते १५ ऑक्टोबर दरम्यान दुपारी १२ ते ३ या वेळेस संपर्क साधण्याचे यावेळी सांगण्यात आले.
तसेच आर्दामधवा, आदिशक्ती दुर्गादेवीच्या उपासनेच्या दुर्गोत्सवाला लवकरच प्रारंभ होत आहे. दुर्गोत्सव मंडळांच्या तयारीला वेग आला असून यंदा दुर्गोत्सवात शहरातील विविध भागातील मंडळांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून देवीचा जागर करावा, असे आवाहन खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
यावर्षी दुर्गोत्सवात नाट्य संगीत, सुगम संगीत (भावगीत, भक्तिगीत, अभंग, देशक्तीपर गीत, गीतरामायणावर आधारित निवडक गीते) भजन, कीर्तन, देशक्तीपर नृत्य, गोंधळ, भारुड, नकला, एकल व समूह नृत्य, समूह वादन, कथाकथन, रांगोळी प्रशिक्षण, पारंपरिक खेळ, एकापात्री प्रयोग, कविसंमेलन (हिंदी व मराठी ), लोकनृत्य, जादूचे प्रयोग, जागरण, दृकश्राव्य कार्यक्रम असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. इच्छुक मंडळोंनी १ ते ७ ऑक्टोबर पर्यंत नावे नोंदवावी. या कार्यक्रमांच्या नोंदणीसाठी नितीन गडकरी यांचे जनसंपर्क कार्यालय, पहिला मजला, गडकरी वाडा, महल, नागपूर येथे दुपारी १२ ते ५ या वेळेस क्रमांकावर संपर्क साधावा.
पत्रकार परिषदेला जयप्रकाश गुप्ता यांच्यासह प्रा. राजेश बागडी, अतुल गुरु, संजय बंगाले, अविनाश घुर्शे, धनंजय डेफेकर, अभिजीत जाधव, जगदीश बावनकर यांची उपस्थिती होती.













