निवडणूक आयोगाविरोधातील मोहिमेला ठरवले ‘सुनियोजित कट’
लोकवाहिनी न्यूज नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनांवर ४२ माजी न्यायाधीशांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांना ‘कठपुतली’, ‘चोर’ आणि ‘तडजोडीचे’ असे संबोधले जात असल्याचा उल्लेख करत, हा प्रकार निहित राजकीय हितसंबंधांनी प्रेरित असलेली ‘सुनियोजित मोहीम’ असल्याचा गंभीर आरोप माजी न्यायाधीशांनी केला आहे.
देशातील ४२ माजी न्यायाधीशांनी एका खुल्या पात्राद्वारे निवडणूक प्रक्रिया राबवणाऱ्या अधिकाऱ्यांच्याविरोधात अपशब्दोंचा वापर आणि ‘सत्तांतर झाल्यास बदला घेतला जाईल’ अशा स्वरूपाच्या धमक्यांवर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. राजकीय हेतूने लोकशाहीतील घटनात्मक संस्थांविषयी अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच जगातील सर्वात मोठ्या लोकशाही व्यवस्थेला अस्थिर करण्याच्या या मोहिमेचे संभाव्य परिणाम अत्यंत गंभीर असू शकतात, असा इशाराही त्यांनी दिला आहे. लोकांचा विश्वास डळमळला तर गंभीर परिणाम
माजी न्यायाधीशांनी आपल्या पत्रात लोकशाही व्यवस्थेचा पाया हा जनतेचा विश्वास असल्याचे अधोरेखित केले आहे. निवडणुकांवरील जनतेचा विश्वास कमी झाला आणि ‘मटाला काहीच अर्थ नाही’ अशी भावना निर्माण झाली, तर त्याचे पडसाद रस्त्यावरील आंदोलनांच्या रूपाने उमटू शकतात, असा इशारा त्यांनी दिला. अशांतेची सुरुवात एका कथानकापासून होते. त्यानंतर अराजकवादी आणि कट्टरपंथी घटक निर्माण झालेली पोकळी भरून काढतात.













