नागपूर : विदर्भातील १३ लाख व्यापाऱ्यांची अग्रेणी व शीर्ष संस्था असलेल्या नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सची ८२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी हॉटेल द्वारकामाई, एस.टी. बस स्टँडजवळ, गणेशपेठ येथे पार पडली. याप्रसंगी २०२६-२७ साठी चेंबरची नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात येऊन अध्यक्षपदी स्वप्निल अहिरकर तर सचिवपदी हेमंत सारडा यांची निवड करण्यात आली.
अश्विनी अग्रवाल, रामअवतार तोतला व उमेश पटेल यांची उपाध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली. सचिन पुनियानी कोषाध्यक्ष, दीपक अग्रवाल, मनीष जेजानी, अशोक संघवी यांची सहसचिव तसेच धर्मेंद्र अर्जुनदास आहूजा यांची पीआरओ पदावर नियुक्ती केली.
सदस्यांमध्ये राजवंतपाल सिंह तुली, हरमनजीत सिंह बावेजा, अभय अग्रवाल, मोहन गट्टाणी, प्रभाकर देशमुख, अक्षय ठक्कर, योगेश बंग, भवानीशंकर दवे, साकेत सुरी, मधुर बंग, सूर्यकांत अग्रवाल, ॲड. निखिल अग्रवाल, सलीम अजानी, सुनील जग्यासी, सुशील झाम, उमंग अग्रवाल, विकेश अग्रवाल, प्रकाश मेहाडिया, मनोज लटुरिया, हुसैन एन. अजानी, मोहन चोईथानी, राकेश आहूजा, गजानंद गुप्ता, संतोष काबरा, राकेश गांधी, महेश कुकडेजा, सुनील भाटिया, राजकुमार गुप्ता, दौलत कुंगवानी, योगेश भोजवानी, नारायण तोष्णीवाल, संजय अग्रवाल (पचेरीवाला), ज्ञानेश्वर रक्षक, राजू माखीजा, अमित अग्रवाल यांचा समावेश आहे. को-ऑप्ट सदस्य म्हणून वीरेंद्र चांडक, गिरीश मुंदडा, कृष्णा सारडा, आशिष अग्रवाल, मनीष अग्रवाल, निर्माण अग्रवाल, राजेश मुनियार, रामनिवास गर्ग, नटवर पटेल, प्रवीण अग्रवाल व विजय केवलरमानी यांची निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित अध्यक्ष अहिरकर यांनी सभेत उपस्थित सर्व माजी अध्यक्ष व सदस्यांचे चेंबरचे नवे अध्यक्ष म्हणून निवड केल्याबद्दल आभार मानले आणि आपल्या कार्यकाळात व्यापारी हितासाठी कार्य करत चेंबरला नव्या उंचीवर नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. सचिव सीए हेमंत सारडा यांनी निवडणूक अधिकारी वीरेंद्र चांडक व त्यांचे सहकारी सीए गिरीश मुंदडा, राजेश मुनियार यांनी नवीन कार्यकारिणीची निवडणूक शांततापूर्ण पार पाडण्यासाठी तसेच चेंबरची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न करण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल चेंबरच्या कंपनी सेक्रेटरी सीएस पिंकुश जैस्वाल व टीमचा पुष्पगुच्छ देत सत्कार करून त्यांचे आभार मानले. सभेला सुमारे २०० सदस्य उपस्थित होते.















