श्री सिद्धिविनायक पब्लिसिटीची विस्मरणीय प्रस्तुती
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : श्री सिद्धिविनायक पब्लिसिटीच्या वतीने ‘बॉलीवुड क्लासिक’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी शंकरनगर येथील साई सभागृहात करण्यात आले. बॉलीवूडमधील लोकप्रिय आणि सदाबहार गीतांच्या सुरेल प्रस्तुतींनी रसिक मंत्रमुग्ध झाले. संगीतप्रेमींनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. कार्यक्रमाची सुरुवात समीर पंडित यांनी ‘प्यार मांगा है तुम्ही से’ या गीताच्या मधुर प्रस्तुतीने केली.
कार्यक्रमाला అతిथी गायिका म्हणून निकिता जोशी उपस्थित होत्या. पारोलकर यांनी ‘आज की रात’, विहार वाइणडेस्कर यांनी ‘ये मोनी बागामा’, ‘रंभा हो’, डॉ. कल्याणी ‘आओ ना गले लगाओ’, नीरजा धांडे कापसे यांनी ‘जादू है नशा है’, मंजूषा यांनी ‘मन सात समंदर’, शशिकांत दिवटे यांनी ‘ये मेरा दिल यार का’, वाघमारे यांनी ‘ओ मेरे सोना रे’, हितेन्द्र मून यांनी ‘रुक जाना ओ’, ‘दिल तो है दिल’, डॉ. अमृता जाना’, सुनील माहूरकर यांनी ‘जाने केले. ‘क्या सोचकर’, पदमशेकर यांनी ‘चला जाता हूँ किसी के दिल पे’, ‘रूप तेरा मस्ताना’ आणि विवेक प्रतापे यांनी ‘फूलों के रंग से’ या गीतांची प्रस्तुती देत रंगत वाढवली. त्यानंतर कलाकारकांनी ‘दरिया किनारे’, ‘पर्वत से काली’, ‘यादा कर ले साजना’, ‘हम दोनों दो प्रेमी’, ‘तुम जो चले गए तो’, ‘सागर किनारे’, ‘मेरे प्यार की उमर’, ‘क्या यही प्यार है’, ‘प्यार करने वाले’ यासारख्या अनेक सुरेल युगलगीतांचीही प्रस्तुती दिली.
कीबोर्डवर परिमल जोशी, गिटारवर ऋग्वेध पांडे, ऑक्टोपेडवर महेंद्र वटुळकर, ढोलकवर पंकज यादव आणि तुम्बावर राजेश धामणकर यांनी सुरेल साथसंगत केली. कार्यक्रमाचे निवेदन व समीक्षा चरडे यांनी ‘ओ मेरे सोना रे’, आभारप्रदर्शन समीर पंडित यांनी केले.














