वाणिज्य राजदूतांसह अभिनेत्यांची उपस्थिती
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : नागपूर शहराची अतिशय जुनी, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा असणाऱ्या मारबत महोत्सावाला यावर्षी प्रथमच बॉलीवूडमधील कलावंत व विविध देशातील वाणिज्य राजदूतांनी हजेरी लावल्याने या महोत्सावाला जागतिक ओळख प्राप्त झाली. तन्हाने तेली समाजाच्या पुढाकाराने दरवर्षी पिवळी मारबत व काळी मारबत उत्सव समितीच्या वतीने हा महोत्सव आयोजित केला जातो. नागपूरच्या लोक परंपरेतील या महोत्साвача ढोल-ताशांच्या गजरात आनंद व आस्वाद् देशी-विदेशी पाहुण्यांनी घेतला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे अर्थ व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार कृष्णा खोपडे, आमदार मोहन मते, आमदार प्रवीण दटके, आमदार डॉ. राजीव पोतदार, महापौर नीता ठाकरे, फ्रान्सचे वाणिज्यदूत पॅट्रिक लेवेरीनो, नॉर्वेच्या वाणिज्य दूत मोनिका निगलगाड, फिनलँडच्या वाणिज्य झूत पेट्र थीमन, प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफ, सुप्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई, प्रसिद्ध क्रिकेटपटू उमेश यादव, अभिनेता अंकुश चौधरी, उपमहापौर लीला हाथीबेडे, स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे, सत्ता पक्षनेता नरेंद्र (बाल्या) बोरकर, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, आयुक्त डॉ. विपिन, ज्येष्ठ नगरसेविका आभा पांडे, क्रीडा समितीच्या सभापती दर्शना धवड, माजी महापौर दयाशंकर तिवारी, माजी महापौर अर्चना डेहनकर यांच्यासह साम टीव्हीचे संपादक निलेश खरे, एबीपी माझाच्या संपादक सरिता कौशिक, प्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर, ग्राफिक डिझायनर विवेक रांडे यांनी या महोत्सावाला हजेरी लावली.
मुख्यमंत्री, महापौर यांच्यासह फ्रांस, नॉर्वे व फिनलँड देशाचे वाणिज्य राजदूतांनी पिवळी मारबतच्या मिरवणुकीवर पुष्प वर्षाव केला. यावेळी चितार ओली चौकात जमलेल्या हजारो संख्येच्या नागरिकांनी जल्लोष करून ईडा पिडा घेऊन जा गे… मारबत… या घोषणेचा गजर केला.
विदेशी पाहुण्यांनी घेतला आस्वाद्
मारबत महोत्सा्याचे फ्रान्स, नॉर्वे व फिनलँडच्या वाणिज्य दूतांनी निरीक्षण केले. यावेळी त्यांनी या मिरवणुकीचा पुरेपूर आस्वाद् घेतला. अनेकांनी छायाचित्रे काढून तसेच मोबाईलमध्ये क्षण चित्रबद्ध केले. याच ठिकाणी काळी मारबत व जागनाथ बुधवारी येथून निघणारी पिवळी मारबतीचे मिलन होते. तॆथून या दोन्ही मारबतीच्या मिरवणुकी शहरातील विविध भागातून मार्गक्रमण करतात. सरतेशेवटी त्याचे तलावात विसर्जन केले जाते.
जॅकी श्रॉफने ‘बीडू!’ म्हणताच उत्साह संचार
सुप्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी आपल्या चिरपरिचित अंदाजात ‘बीडू’ उच्चारताच उपस्थितांमध्ये एकच उत्साह संचारला, त्यांनी “ईडा पिडा घेऊन जा गे…!”ची बोंब ठोकाताच उपस्थितांनी त्यांना ‘मारबत’ या घोषणाने प्रतिसाद् दिला. परिणामी संपूर्ण वातावरण जल्लोषमय झाले. त्यांनी नृत्य करीत उपस्थितांच्या विनंतीला मान दिला. यावेळी अनेकांनी जॅकी श्रॉफ सोबत सेल्फी काढून घेतली.
फिल्ड नव्हे फिल्ड मार्शल
यावर्षी बडग्याची संकल्पना पाकिस्तानचे फिल्ड मार्शल आसिम मुनीर यांच्यावर आधारित होती. भारतासोबत नेहमीच युद्धाची भाषा करणाऱ्या आसिम मुनीर यांचे फिल्ड (अयಶಸ್वी) मार्शल असे वर्णन करून बडग्या काढण्यात आला.
उमेश यादव झाले भावूक
भारतीय क्रीडापटू उमेश यादव उत्सवातील नागरिकांचा प्रचंड उत्साह पाहून भावूक झाले. त्यांच्यासाठी हा अत्यंत रोमर्षक क्षण असल्याचे आणि “अशा विलक्षण गोष्टी फक्त नागपूर शहरातच होऊ शकतात असे ते म्हणाले. नागपूरचा हा पारंपरिक व सांस्कृतिक उत्सव जगभराजपर्यंत पोचावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. नागपूर हे आता लहान राहिलेल नसून, मोठे व प्रगत झाले आहे. जेव्हा अशा वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन नागपूर शहरात होते तेव्हा एक नागपूरकर म्हणून गर्व वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.











